कचरा उचलण्यावरुन सत्ताधारी नगरसेवकाचा जोरदार स्टंट 

सातारा – सातारा विकास आघाडीचे सत्ताधारी नगरसेवक विशाल जाधव यांनी सदर बझार येथे कचरा उचलला जात नसल्याच्या कारणावरुन गुरुवारी पालिकेत जोरदार स्टंट केला.आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांच्याशी जाधव यांचा नगराध्यक्षांच्या दालनात जोरात वाद झाला.

आरोग्य विभागातील टक्केवारीवर बाचाबाची झाल्याने साविआत पुन्हा वादाची भांडी वाजू लागली . सदर बझार येथील कचऱ्याचे कंटेनर उचलले गेल्याने व धंटागाडी न फिरकल्याने शहराच्या पूर्व भागात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. याची तक्रार करण्यासाठी कचऱ्याचा ट्रॅक्‍टर घेउन नगरसेवक विशाल जाधव थेट नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या दालनात धडकले आणि पालिकेत कचरा ओतण्याचा इशारा दिला. नगराध्यक्षांनी आरोग्य सभापती यदुनाथ नारकर व भाग निरिक्षक यांना पाचारण केले. सत्ताधारी भसताना जाधव यांनी असा स्टंट करावा यावर नारकर यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना खडसावले. त्यावरून जोरदार हमरा तुमरी झाली. नंतर या वादावादीत वसंत लेवे या यांचा सहभाग वाढला. साशा कंपनी आणि त्याची टक्केवारी या वर वादावादीची गाडी घसरल्याने वातावरण तापले . त्यामुळे नारकर यांनी रागाच्या भरात तेथून काढता पाय घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)