कचरा उचलण्याचे पालिकेला आदेश देण्याची मागणी

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) – शहरात घंटागाडी चालकांचा संप अन्‌ कंत्राटाच्या घोळात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे तत्काळ नवीन कंत्राटदाराला कचरा उचलण्याचे आदेश देवून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू व मलेरिया अशा साथीने लोकांचा बळी गेला आहे. तरी देखील सातारा नगरपालिका कचरा व्यवस्थापन गांभिर्याने घेत नाही. कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. नव्याने निविदा प्रक्रिया पुर्ण होवून दर मंजूर झाले आहेत. अशावेळी मुख्याधिकारी कोणाच्या तरी दबावात अडकले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून तात्काळ नवीन ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी सयाजी शिंदे, रमेश बोराटे, आशुतोष पारंगे, अजय सावंत, निलेश मोरे आदी.उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)