कचरा उचलणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड – येथील नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती होण्यासाठी चालता बोलता कचरा उचलणे स्पर्धा गुरुवारी आयोजित केली होती. स्पर्धेत राणी जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. नगरसेविका स्मिता हुलवान यांनी द्वितीय, संगीता इटकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

रेखा वाघमारे, प्रमोद पुरोहित, शोभा मोरे, जयश्री भोसले, अमित कांबळे, रामाबाई कुराडे, बाळाबाई माने, दीपाली रेपाळ, हिराबाई कुराडे, शिला मोरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेमध्ये 173 लोकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली. पालिकेमार्फत कचरा वेचण्यासाठी सुरक्षा साधने, ग्लोव्हज, मास्क व कचरा भरण्यासाठी पोती देऊन प्रत्येक स्पर्धकांना नंबर दिले होते.

-Ads-

स्पर्धकांनी शहरातून फिरुन रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करुन घाटावर आणला. त्या ठिकाणी त्या कचऱ्याचे वजन घेतले. सर्वात जास्त कचरा आणून देणाऱ्या नागरिकांना विजयी घोषित करण्यात आले. नगरसेविका स्मिता हुलवान यांनी स्पर्धेत भाग घेत बक्षीस मिळवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. मुख्याधिकारी डांगे, मोहन वाळिंबे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. प्रियांका यादव विजय वाटेगांवकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)