कंबर व पाठदुखीकडे नको दुर्लक्ष (भाग २)

सुजाता टिकेकर 

पाठदुखी आणि कंबरदुखी ही अगदी कॉमन आणि नॉर्मल वाटणारी दुखणी. कामाच्या ताणने किंवा अशक्‍तपणानेही पाठदुखी व कंबरदुखी सुरू होते. या दुखण्याकडे बरेचवेळा दुर्लक्षही केले जाते, पण जर का अशी पाठदुखी किंवा कंबरदुखी वरचेवर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. ही दुखणी मागे का लागतात तर…

संकल्पस्मृती 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संकल्पस्मृती म्हणजे योगनिद्रेच्या प्रारंभी जागृत मनाने केलेला संकल्प आता या टप्प्यात पुन्हा एकदा मनावर खोलवर ठसवणे. योगनिद्रेतील साधनेत जागृत मन व सुप्त मन यांची दारे उघडतात. अशावेळी संकल्प जशाच्या तसा दोन ते तीन वेळा मनातल्या मनात आठवावा. आपल्या जागृत मनात जे बदल करायचे आहेत ते आपण निवडलेल्या संकल्पानुसार त्या संकल्पांचे बीज सुप्त मनात पेरले गेल्यानेच घडणार आहेत. योगनिद्रेचा अपेक्षित परिणाम प्रभावीपणे साधेल. हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. सुप्त मनात सामर्थ्य निर्माण होते. आपण संकल्पपूर्तीच्या मागे पूर्णपणे उभे राहतो. तो संकल्प जीवनात प्रत्यक्ष साकार होणार आहे. योगनिद्रेच्या प्रारंभीच्या टप्प्यात केलेला संकल्प तर योगनिद्रेच्या या अंतिम टप्प्यात त्याच संकल्पाची केलेली स्मृती यातूनच योगनिद्रेच्या समाप्तीची वाटचाल सुरू होते.

योगनिद्रेचा शेवट 

योगनिद्रेच्या पस्तीस मिनिटांच्या प्रक्रियेनंतर शरीर व मन अतिशय शिथिल, नाजूक व तरल अवस्थेत असते. त्यामुळे त्याची जागृती अत्यंत हळुवार करावी. त्यासाठी मन व शरीराचे प्रत्येक अवयव हळूहळू जागृत करावे. अखेर शरीर व मनाची जागृती करून हळूहळू उठून बसावे. शरीर व मन योगनिद्रेतून पूर्वस्थितीत आणावे. योगनिद्रेद्वारा संधिवात झालेल्या रोग्यांच्या मनावर रोगच नसल्याचा संकल्प ठसवला जातो. योगनिद्रा ही सोपी व 100% जमण्यासारखी प्रक्रिया आहे. आठवड्यातून केव्हाही करू शकतो. योगनिद्रेसाठी कोणत्याही शारीरिक व्याधीचे बंधन नाही. घरच्याघरीसुद्धा संपूर्ण विश्रांती अवस्थेत योगनिद्रा घेता येते.

योगनिद्रेतून संधिवाती रुग्णाला शारीरिक व मानसिक विश्रांती मिळते. चंचल मनामुळे प्रचंड मानसिक ताण येतो व संधिवाताचा विकार जडतो. या विकारावर औषधोपचारासोबत योगनिद्रा घ्यावी. योगनिद्रा हे प्रभावी औषध आहे. जे संधिवाताची परिस्थिती नियंत्रणात आणते. दिवसातील 35 मिनिटे योगनिद्रेच्या साधनेसाठी राखून ठेवावी. ज्यामुळे बरेच प्रश्‍न चटकन सुटतील. फक्‍त श्रद्धा व सातत्य हवे.

योगनिद्रेमुळे संधिवातामुळे त्रस्त झालेल्या रोग्यांचा काळ सुखावह होतो. फक्‍त योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगनिद्रा केल्यास त्याचा अधिक फायदा मिळतो. योगनिद्रेच्या साधनेपूर्वी प्राथमिक स्वरूपाची काही आसने व प्राणायाम करावा. म्हणजे योगनिद्रा चांगल्या तऱ्हेने करता येते. आपल्या स्वतःच्या गरजेनुसार शारीरिक व मानसिक क्षमतेनुसार योगनिद्रा घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)