नवी दिल्ली -राष्ट्रीय शेअरबाजारात सूचीबद्ध असणाऱ्या 1 हजार कंपन्यांपैकी 33 टक्के कंपन्यांनी एका स्वतंत्र महिला संचालकाची नियुक्ती करावी लागणार आहे. कंपनीच्या संचालकांमध्ये किमान एका महिलेची नियुक्ती असावी अशी शिफारस कोटक समितीकडून सेबीला करण्यात आली होती. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. या 336 कंपन्यांनी 1 एप्रिल 2020 पर्यंत स्वतंत्र महिला संचालकांची नियुक्ती करावी लागणार आहे.
एनएसईमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अव्वल 500 कंपन्यांपैकी 155 कंपन्यांना 1 एप्रिल 2019 पर्यंत ही नियुक्ती करावी लागणार. संचालकीय कामकाजामध्ये समानता येण्यासाठी आणि मंडळामध्ये दोन महिला संचालकांची नियुक्ती करणे हा सकारात्मक निर्णय आहे. 2013 च्या कंपनी कायद्यानुसार कंपनीमध्ये किमान एक महिला संचालक असणे अनिवार्य आहे. ऑक्टोबर 2014 पासून हा नियम अनिवार्य आहे. मात्र अनेक कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आपल्य कुटुंबातील महिला अथवा नातेवाईकांमधील सदस्यपदी घेण्यातच सार्थक मानले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा