कंपन्यांतील रोजगारांत वाढ होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली -यंदा कंपन्यांकडून नोकरभरतीत वाढ केली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांतही वाढ होणार आहे. विझ्डम जॉब्ज डॉट कॉमम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्‍के कंपन्यांनी नोकरभरती वाढणार असल्याचे मत व्यक्‍त केले. या अहवालात म्हटले आहे की, नोटाबंदी, एच 1 बी व्हिसाचे नियम आणि जीएसटी यामुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांतून औद्योगिक क्षेत्र आता सावरले आहे. त्यामुळे रोजगाराच्या बाबतीत आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 54 टक्‍के कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ जैसे थे राहण्याची शक्‍यता असल्याचे नमूद केले. 39 टक्‍के कंपन्यांनी लाभ वाढतील, असे म्हटले, तसेच 5 टक्‍के उत्तरदात्यांनी लाभ घटतील, असे म्हटले. कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या लाभात वाढ होईल, असे मत 60 टक्‍के कंपन्यांनी व्यक्त केले. विझ्ड  संस्थापक व सीईओ अजय कोल्ला यांनी सांगितले की, यंदा आयटी, तंत्रज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवेश होत असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. वस्तू उत्पादन, आयटी, वाहतूक आणि अतिथ्य या क्षेत्रात 2017 मध्ये नोकजया कमी झाल्याचे दिसून आले होते. या क्षेत्रांतही यंदा काही सुधारणा दिसून येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)