कंपन्यांच्या सामाजिक विषयावरील खर्चात वाढ

मुंबई – कंपन्यांकडून नफ्यापैकी काही प्रमाणात खर्च करण्यात येणाऱ्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)मध्ये गेल्या दोन वर्षात 14 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपन्यांच्या नफ्यात वाढ झालेली नसूनही सीएसआरमध्ये वाढ दिसून आली. क्रिसिल फाउंडेशनकडून सूचीबद्ध असणाऱ्या 1,186 कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला.

दोन आर्थिक वर्षात कंपन्यांच्या सीएसआरमध्ये 14 टक्‍के, तर नफ्यामध्ये केवळ 5 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. सीएसआरचा खर्च करण्यासाठी गैरसरकारी संस्थांचा वापर करण्यात येत आहे. सूचीबद्ध कंपन्यांपैकी 74 टक्‍के कंपन्या एनजीओचा वापर करत असून दोनतृतीयांश लहान कंपन्यांचा समावेश आहे. दोनतृतीयांश कंपन्यांनी सीएसआरसाठी पाच व्यक्तींची नियुक्ती केली आहे. सीएसआरचा खर्च व्यवस्थित होण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. सीएसआरच्या एकूण खर्चाच्या तुलनेत 5 टक्‍क्‍यांपेक्षा वेतनावर होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)