कंपन्यांचा आडमुठेपणा ग्राहक संभ्रमात (भाग-१)

केबल चालकांच्या मक्‍तेदारीला-दादागिरीला शह मिळाला तो डीटूएच सेवेने, पण ही सेवाही तशी कुचकामीच होती कारण या खासगी वाहिन्यांचे महिन्याला असणारी वर्गणी अव्वाच्या सव्वाच होती आणि अजूनही आहे. तुम्ही एखादे पॅकेज निवडायचे म्हटले तर तुम्हाला हवी असलेली सगळी चॅनेल्स त्या पॅकेजमध्ये असतीलच असे नाही. शिवाय तुम्हाला हव्या त्या चॅनेल्सचे पॅकेज करून देण्याची तयारी या डीटूएच कंपन्यांची नसते. त्यांच्याकडे असलेल्या पॅकेजमधूनच तुम्हाला निवड करावी लागते आणि तुम्हाला हवे असलेल्या चॅनेलसाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. आता एका पॅकेजमध्ये आपल्याला हवी असलेली चॅनेल्स नसतील आणि नको असलेली चॅनेल्स असतील तर ती नको असलेल्या चॅनेल्ससहीत आपल्याला ते पॅकेज स्वीकारावे लागते. नको असलेल्या चॅनेल्सच्या बदल्यात हव्या असलेल्या चॅनेल्सचा त्या पॅकेजमध्ये समावेश होत नाही. म्हणूनच तुम्ही समजा तुम्हाला परवडणारे एखादे पॅकेज निवडले आणि त्यात तुमच्या आवडत्या काही चॅनेल्सबरोबर कन्नड, बंगाली, तमिळ वगैरे भाषांतील चॅनेल्स असतील आणि आपल्याला ती नको असतील तर ती न बघणे हाच आपल्याकडे पर्याय असतो. कारण आपल्याला नको असलेल्या चॅनेल्सच्या बदल्यात हवी असलेल्या चॅनेल्सचा पॅकेजमध्ये समावेश करण्यास ऑपरेटर कंपनी तयार नसते आणि कारण नसताना आपल्याला नको असलेल्या चॅनेल्सचा भुर्दंड सोसावा लागतो.

कंपन्यांचा आडमुठेपणा ग्राहक संभ्रमात (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता ट्रायने दिलेल्या नव्या आदेशानुसार या कंपन्यांना 153 रुपयांत 100 चॅनेल्स ग्राहकांना पुरवायची आहेत आणि या बेसिक पॅकमध्ये ग्राहक आपल्या आवडीच्या चॅनेल्सही समाविष्ट करू शकतात, अशी मुभाही आहे आणि याच आदेशाला आता केबल ऑपरेटर आणि सर्विस प्रोवायडर कंपन्या केराची टोपली दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि म्हणूनच ग्राहकांनीही आता याबाबतीत एकजूट दाखवण्याची गरज आहे. 153 रूपयांत 100 चॅनेल्स या पॅकेजमध्ये फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारच्या चॅनेल्सचा समावेश आसणार आहे. 1 फेब्रुवारीपासून ही नवी व्यवस्था लागू होणार आहे. त्यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून माहितीही दिली जात आहे, असे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात सर्व्हिस प्रोवायडर कंपन्यांकडून या माहितीला प्रतिसाद दिला जात नाहीये. कंपन्यांकडे चौकशी केल्यावर अद्याप आमच्याकडे त्याबाबतचे सर्क्‍युलरच आलेले नाही किंवा अद्याप तसा काही निर्णय झालेला नाही, अशी उत्तरे दिली जात आहेत. कंपन्या आणि केबल चालक अजूनही जुन्याच दराने ग्राहकांकडून चार्जेस आकारत आहेत आणि ग्राहकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

ट्रायचा आदेश न पाळण्यासाठी सर्व केबल चालक आणि सर्व्हिस प्रोवायडर्स एकत्र आले आहेत, तसे ग्राहकांनीही एकत्र येऊन नव्या दराप्रमाणे चार्जेस लागू न करणाऱ्या केबल चालक किंवा सर्व्हिस प्रोवायडरची सेवा घ्यायची नाही असे एकत्र येऊन ठरवले पाहिजे. तसा दबाव या सेवा पुरवणाऱ्यांवर आला तरच ग्राहकांच्या हिताचे निर्णय लागू होऊन त्यांची अंमलबजावणी होईल. अन्यथा ग्राहकाची पिळवणूक थांबणार नाही.

– सूर्यकांत पाठक, कार्याध्यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)