कंपन्यांकडून पर्यायी इंधनावर संशोधन

संग्रहित छायाचित्र

आगामी काळात वाहन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची शक्‍यता

मुंबई-वाहनांचे प्रदूषण कळीचा मुद्दा ठरल्याने पर्यावरणानुकुल गाड्या तयार व्हाव्यात यासाठी कंपन्या संशोधन आणि विकास करीत आहेत. कार्बन उत्सर्जनच टाळण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या कार विकसित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पर्यावरणानुकुल भारत-4 श्रेणीतील इंजिनांच्या निर्मितीची सक्ती कंपन्यांवर करण्यात आली आहे. पण तरीही पारंपरिक इंधनाच्या गाड्या काही प्रमाणात तरी प्रदूषण करतात. यामुळेच अशा इंधनालाच पर्याय निर्माण झाला तर. हा प्रयत्न ऑटो एक्‍स्पोमध्ये होंडा कार्सने वेगळ्या तंत्रज्ञानाद्वारे केला आहे. होंडाने क्‍लॅरिटी फ्युएल सेल श्रेणीत सादर केलेली एफसीव्ही गाडी भविष्यातील कार ठरेल. ही गाडी पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्‍ट्रिक बॅटरीवरही चालणारी नाही.

त्या गाडीचे इंधन हायड्रोजन आहे. हायड्रोजन हे इंधन गाडीला लागणारी वीज तयार करते, त्यावर गाडी धावताच, उत्सर्जनाच्या रूपात पाणी बाहेर पडते, अशी गाडी जपान व अमेरिकेत ग्राहकांकडे आहे. ही गाडी भारतात येण्यासाठी हायड्रोजनची उपलब्धता असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सक्षम धोरणांची गरज असेल. आता इथेनॉलवर धावणारी बाइक येऊ घातली आहे. इथेनॉलमधील 35 टक्‍के ऑक्‍सिजन हे इंधनाच्या रूपात काम करेल. त्यातून बाइकमधून होणाऱ्या नायट्रोजन ऑक्‍साइडचे उत्सर्जन कमी होईल, असे हे तंत्र टीव्हीएसने विकसित केले. ही बाइक 129 किमी वेगाने धावू शकेल.

वाहनाचा जीव इंजिनात असतो. गाडी आतून वा बाहेरून आधुनिक केली. परंतु इंजिन जुने असून चालत होत नाही. यासाठीच पॉवरट्रेन्स इंजिने येत आहेत. 30 टक्‍के इंधन क्षमता वाढणारे हे तंत्रज्ञान ग्रीव्हज्‌ कॉटनने आणले. 30 कार, ऑटो उत्पादकांना या इंजिनांचा पुरवठा करू, असे कंपनीचे सीईओ नागेश बसवनहळ्ळी म्हणाले. पेट्रोल, डिझेल गाड्यांना इलेक्‍ट्रीक बॅटरीचा पर्याय असल्याचे बोलले जाते. मात्र ही बॅटरी चार्ज करण्यासाठी जी वीज लागते, ती वीज तयार करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतच असते. यामुळे प्रदूषणमुक्तीचे अंतिम ध्येय कसे पूर्ण होणार? हे सारे काही टाळण्यासाठी हायड्रोजन हा सर्वोत्तम पर्याय आहे असे बोलले जाऊ लागले आहे. त्याच दृष्टीने पर्यायी इंधनाबाबत ऑटो इंडस्ट्रीमध्ये संशोधन सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)