कंपन्यांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना दुय्यम महत्त्व 

संग्रहित छायाचित्र

मुंबई: भारतातील कंपन्यांनी आतापर्यंत इलेक्‍ट्रिक वाहनाना दुय्यम महत्त्व दिले जात आहे. या कंपन्या दुय्यम स्वरुपाची उत्पादने भारतात सादर करीत असल्याचे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, भारतात टेस्लाच्या दर्जाची दुचाकी किंवा तीन चाकी वाहने सादर करण्यास वाव होता. त्यामुळे भारताची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असती. आता आम्ही ते प्रयत्न करणार असल्याचे त्यानी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

भारतात अशी वाहने तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारही पूरक वातावरण तयार करीत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकास करण्यास वाव असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे वाहनांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
त्यांनी सांगितले की, आमच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत. डिस्कव्हर 125 सीसी यशस्वी झाल्यानंतर आम्ही हिच गाडी 100 सीसीत सादर केली. मात्र त्याला ग्राहकानी फारसा प्रतिसाद दिला नाही. आम्हाला मी टू महागात पडले असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)