कंपन्यांकडून अधिग्रहणाचे व्यवहार वाढत जाणार 

नवी दिल्ली: जुलै महिन्यात देशातील उद्योग समूहांकडून 8.7 अब्ज डॉलर्सचे अधिग्रहणाचे व्यवहार झाले. आगामी काळात असे व्यवहार वाढण्याची शक्‍यता आहे. जानेवारीपासूनच्या पहिल्या सात महिन्यात एकूण व्यवहारांची आकडेवारी 74.16 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ग्रॅन्ड थ्रॉन्टनन्सच्या डीलट्रकर या अहवालानुसार गेल्या महिन्यात 8.71 अब्ज डॉलर्सचे 49 व्यवहार पूर्णत्वास गेले आहेत. गेल्या वर्षाच्या आधारे यात 22 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली.
जानेवारी ते जून कालावधीत 284 व्यवहार पूर्ण झाले असून त्यांचे मूल्य 74.18 अब्ज डॉलर्स आहे. देशांतर्गत आणि विदेशी व्यवहारांमध्ये चांगली वाढ दिसून आली. या मूल्यामध्ये 7 पटींनी वाढ नोंदविण्यात आली. या कालावधीत एक अब्ज रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे 12, तर 100 दशलक्ष डॉलर्सचे प्रत्येकी 33 व्यवहार झाले आहेत. दूरसंचार, ई व्यापार, उत्पादकता, ऊर्जा, कृषी, बॅंकिंग आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक व्यवहार झाले असून एकूण व्यवहारांपैकी या क्षेत्रांचा हिस्सा 94 टक्के आहे. स्टार्टअप क्षेत्रात सर्वाधिक व्यवहार झाले असून हिस्सा 21 टक्के आणि आयटी व उत्पादकतेचा एकत्रित हिस्सा 25 टक्के आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)