कंपनी कर 5 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता

काळा पैसा कमी होण्यास मदत होईल


प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा वाढण्याची गरज

मुंबई – लवकरच जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात कंपनी कर 5 टक्‍क्‍यांनी कमी होऊन तो 25 टक्‍के इतका होण्याची शक्‍यता असल्याचे कंपन्यातील अधिकऱ्यांना वाटते. डेलॉईट या संस्थेने देशातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता 50 टक्‍के इतक्‍या अधिकाऱ्यानी सांगितले की, या वर्षाच्या अर्थसंकल्पात कंपनी कर कमी होण्याची शक्‍यता आहे. सरकारचा काळा पैसा कमी करण्यावर भर आहे. कर जास्त असल्यास काळा पैसा तयार होतो. त्यामुळे सरकार कर कमी करण्याच्या शक्‍यतेवर विचार करण्याची शक्‍यता आहे.

बऱ्याच अधिकाऱ्यांनी सांगितले की कराबाबत जे विवाद होतात त्याचा वेगात निपटारा होण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून सरकार या अर्थसंकल्पात काही तरी करण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर रियल इस्टेटबाबत काही निर्णय या अगोदर घेण्यात आले असले तरी त्या क्षेत्रात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

त्याचबरोबर वाढलेल्या महागाईचे प्रमाण पाहता प्राप्तिकर उत्पन्न मर्यादेतही वाढ करण्याची गरज आहे. अनेक वर्षापासून या मर्यादेत फारशी वाढ झालेली नाही. ही मर्यादा 33 टक्‍क्‍यांनी वाढवून 2.5 लाख होण्याची शक्‍यता अनेकांना वाटते. तसे झाले तर लोक खर्च करतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्‍यता वाढेल.
आता नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम कमी झाला आहे. त्यामुळे विकासदर वाढत राहण्याची शक्‍यता आहे. शेअरबाजारात आणि इतरत्र गुंतवणूक वाढत आहे, निर्यातही वाढली आहे. याचबरोबर देशातील परकीय चलनाचा साठा वाढला असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीवरून अर्थव्यवस्था वेगाने रूळावर येत असल्याचे दिसून येत असल्याचे या अधिकाऱ्यांना वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)