कंपनीने पीएफ न भरल्यास आता मेसेज आणि ई-मेल येणार

नवी दिल्ली : एखादी कंपनी वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करूनही तो वेळेत जमा करीत नसेल तर, त्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना समजू शकणार आहे. निधी भरण्यात अनियमितता झाल्यास ही माहिती आता सरकारकडूनच ई-मेल किंवा एसएमएसद्वारे समजणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

इपीएफओने सदस्यांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केला नाही, कर इपीएफओ त्या कर्मचाऱ्यांना मेसेज आणि मेलकरून माहिती देण्याची तरतूद या सुविधेमध्ये केली आहे. मात्र, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्याच्या ‘युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांका’शी (यूएएन) जोडलेला असणे आवश्यक आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ‘ईपीएफओ’तर्फे अशाप्रकारची सेवा सभासदांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून संबंधिताच्या वेतनातून कपात होणारी रक्कम भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा होत आहे किंवा  नाही याची माहिती होईल. ही माहिती आता एसएमएस किंवा ई-मेलच्या मदतीने उपलब्ध होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)