कंपनीने कामगारांचा 1 कोटी 89 लाखाची पीएफ थकवला

पुणे,दि.12- फस्ट फ्लाईट कंपनीने 600 कामगारांचा 1 कोटी 89 लाख 19 हजाराची भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकवली आहे. याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फस्ट फ्लाईट कुरिअर कंपनीचे गुलटेकडी मार्केट यार्ड येथे कार्यालय आहे. येथील कार्यालयात साधारणतहा 600 कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचे जुन 2017 ते 2018 या कलावधित मासिक पगारातून 74 लाख 68 हजार 880 रुपये भविष्य निर्वाह निधीसाठी कपात केले होते. त्या निधीत कंपनीने 1 कोटी 14 लाख 50 हजार 736 रुपये भरणे आवश्‍यक होते. मात्र या दोन्ही रकमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा न करता एकूण 1 कोटी 89 लाख 19 हजार रुपयांचा कंपनीने अपहार केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.राठोड तपास करत आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)