कंपनीतून 83 हजारांचे तांबे चोरीला

पिंपरी – एमआयडीसी भोसरी येथे चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागचा पत्रा उचकटून कंपनीतील सुटे पार्ट तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे 83 हजार 500 रुपयांचे तांबे व ऍल्युमिनिअम चोरीला गेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि.18) उघडकीस आला.

याप्रकऱणी राहुल बाबूलाल शहा (वय-30 रा. चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. सीसीटीव्ही फुटेज नुसार तीन अज्ञात आरोपींनी तोंडाला रुमाल बांधत व मंकी कॅप घालून कंपनीच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहावर चढून कंपनीच्या पाठीमागचा पत्रा उचकटून कंपनीतील सुमारे 83 हजार रुपयांचे सुटे पार्ट बनवण्याचे साहित्य चोरले आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)