कंपनीतील रोबोटसह कोट्यवधींचा माल कर्मचाऱ्यांनीच लंपास केला

पिंपरी – चाकण हद्दीत नाणेकरवाडी येथील इनोवेटिव्ह इंडस्ट्रीज कंपनीतून 15 ते 18 कोटींचा माल कंपनीतील चार कामगारांनी लंपास केला. रवींद्र लक्ष्मण चव्हाण (वय 59, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी मधुकर लिमये, हर्षल दप्तरदार, संदीप पाटील, परेश टेलर यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चारही आरोपी ऍटोकंपोनंट विभागात काम करतात. त्यांनी रोबोट, मशिनरी, कच्चा व पक्का माल, टूल्स, ट्रॉली डाइज्‌, कॉम्प्युटर्स, सीसीटीव्ही हार्ड डिस्क, रजिस्टर्स, व्हाउचर्स, चलन इत्यादी माल चोरून नेला. हा सर्व प्रकार 13 ऑक्‍टोबर पूर्वी झाला. मात्र घटना उघडकीस येताच बुधवार दि. 31 ला दुपारी साडेपाचच्या सुमारास गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)