कंपनीच्या ठेक्‍यावरून दोन गटात हाणामारी

रांजणगाव गणपती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल

रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीच्या माथाडीच्या ठेक्‍यावरुन रांजणगाव येथील दोन गटांमध्ये कंपनीच्या गोडाऊनजवळ मारहाण झाली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील इन्सोलेस वेअर हाऊसजवळ ही मारहाण झाली. याबाबत संतोष फक्कड पाचुंदकर आणि अक्षय संजय खेडकर यांनी परस्परांविरोधात रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. संतोष फक्कड पाचुंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीत अक्षय खेडकर, अतुल खेडकर, सतीश रासकर यांनी माथाडीच्या ठेक्‍यावरुन मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर अक्षय संजय खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत संतोष पाचुंदकर, धनंजय दरवडे आणि आकाश भोस यांनी माथाडीच्या ठेक्‍यावरुन मारहाण केल्याचे म्हटले आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार चंद्रकांत काळे आणि एस.डी.कोळेकर हे करीत आहेत. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील शांतता भंग करणाऱ्यांना आणि कायदा सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी कठोर शासन करणार आहे, असा इशारा अमरनाथ वाघमोडे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)