कंपनीची गोपनीय माहिती चोरली

पिंपरी – कंपनीची माहिती चोरून तिचा गैरवापर केल्याप्रकरणी हिंजवडी व भोसरी या दोन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत कंपनीची गोपनीय माहिती चोरून तसेच ती माहिती इतर कंपन्यांना पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीतील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत उघडकीस आला. विजयकुमार रामचंदन (वय-48, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली असून सुरेंद्र अशोक पटवर्धन, वैनातेय जोगळेकर, ज्ञानेश्वर रामभाऊ मानल, रंगनाथा, हिमाली तनपुरे, अभय श्रीराम चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र पटवर्धन यांनी कंपनीचा खासगी डेटा बेकायदेशीररित्या एक्‍सेस केला. तसेच कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता कंपनीच्या कामकाजाची व हिशोबाची गोपनीय माहिती वैयक्तिक इ-मेल आयडीवरून इतर आरोपींना पाठवली. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरी घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी दीपक नारायण पतंगे (वय-60, रा.एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली असून अभिजित पाटील, विजय योगीराज ढवळे, संदीपान देवराव खरात, प्रमोदसिंग राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंगे यांची भोसरी एमआयडीसी परिसरात कंपनी असून आरोपी कंपनीत कामगार आहेत. काम करत असताना कंपनीने गोपनीय माहिती आणि जॉब डिझाईनचा डेटा आरोपींना दिला होता. मात्र आरोपींनी आपापसात संगनमत करून कंपनीला नुकसान पोहोचवण्याच्या दृष्टीने डेटा परत न करता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. एन. आहेर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)