कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना 8.33 टक्‍के बोनस देण्याची मागणी जनरल माथाडी कामगार संघर्ष सेनेने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन केली आहे. महापालिकेच्या कायम व मानधन तत्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे 8.33 टक्के बोनस देण्यात आला, मात्र आता दिवाळीचे दोन दिवस उलटूनही परफेक्‍ट फॅसिलिटीज्‌ सर्व्हिसेच्या ठेकेदाराने आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना बोनस दिला नाही. वर्षभरात सुरक्षेची कोणतीही साधने ठेकेदार देत नाही. या मागणीसाठी सात दिवसांपासून कर्मचारी दापोडीत आंदोलन करीत आहेत. मात्र ठेकेदाराने याची दखल घेतली नाही. अध्यक्ष विकास सातारकर, प्रदीप कांबळे, राजेंद्र गायकवाड, गोपाळ मोरे, महेंद्र येरल्लू, राजकुमार परदेशी, विनोद सोनवणे, मनिषा जाधव, गंगा सिंग, स्वाती सोनार, शालन पवार, अरूणा पोवार शिष्टमंडळात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)