कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा “हल्लाबोल’

– आमदार, आयुक्‍तांच्या निवासस्थानासमोर ठिय्या

पिंपरी – थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्यासाठी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आमदार महेश लांडगे यांचे भोसरीतील तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील निवासस्थानासमोर ठिय्या मांडला. कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील सात ठेकेदारांकडे सुमारे दीड हजार कर्मचारी काम करतात. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, ईएसआय व पीएफ या सामाजिक सुरक्षा पुरविल्या जात नसल्याच्या जुन्या तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरविण्यासह कर्मचाऱ्यांची “बायोमेट्रीक’ उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय किमान वेतन देण्याच्या पुराव्या दाखल बॅंक स्टेटमेंट सादर करण्याच्या अटी व शर्ती असल्याने ही अट न पूर्ण करु शकलेल्या ठेकेदारांची बीले आरोग्य विभागाने अदा केलेली नाहीत. त्यामुळे सुमारे चार महिने बहुतांशी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. याशिवाय ठेकेदाराने कर्मचाऱ्यांची एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवल्याची पोलिसांत देखील तक्रार करण्यात आली आहे.

संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी भोसरी येथील आमदार लांडगे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडला. निदर्शने केली. त्यानंतर मोरवाडीतील महापालिका आयुक्तांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवळा. याठिकाणी सुमारे दीड तास आंदोलन झाले. तीन महिन्यांपासून आम्हाला वेतन मिळाले नाही. आम्ही संसार कसा चालवायचा. ठेकेदारांनी आमचे एटीएम कार्ड देखील काढून घेतले आहे. किमान 11 हजार वेतन असताना आम्हाला केवळ सात हजार रुपयेच वेतन मिळत असल्याचे, आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान, अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, सहायक आयुक्‍त अण्णा बोदडे यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिकेवर गुरुवारी मोर्चा
गेली चार महिन्यांपासून वेतन थकल्याने कंत्राटी सफाई कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर अनेकदा निवेदने व चर्चा देखील करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी (दि. 16) दुपारी साडे तीन वाजता पंचायतीच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)