कंत्राटी कामगारांचा आवाज बुलंद करणार – विजय पाळेकर

लोणावळा – कंत्राटी कामगारांबाबत सरकारची असलेली अनास्था व तोकडे कामगार कायदे यामुळे कंत्राटी कामागारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कंत्राटी कामगारांचा आवाज यापुढे बुलंद करण्याकरिता शिवक्रांती कामगार संघटना काम करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस ऍड. विजय पाळेकर यांनी सांगितले.

चाकण एमआयडीसीमधील केलेबीन इंडिया प्रा. लि. कंपनीतील 175 कंत्राटी कामगारांना शिवक्रांती कामगार संघटनेच्या प्रयत्नांतून कायम करण्यात आले. चार ते पाच महिन्यांपूर्वी या कामगारांनी शिवक्रांती कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपासून संघटना व कंपनी प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर या कामगारांना कायम करण्याचा सकारात्मक निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. नुकतेच या कामगारांना कायम केल्याची पत्र देण्यात आले. यावेळी कंपनी व्यवस्थापनाचे वीरेंद्र जाम, रोहिदास गोरडे, शिंपी संघटनेचे सरचिटणीस विजय पाळेकर, गुलाबराव मराठे, रविंद्र साठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, हनुमंत कलाटे उपस्थित होते.

विजय पाळेकर म्हणाले, कामगार क्षेत्रात सध्या कंत्राटी कामगारांच्या समस्या मोठ्या आहेत. मात्र, त्यांच्याबाबत सरकारची धोरणे उदासीन आहेत. तसेच कामगार कायद्यात बदल होणे गरजेचे आहे. या शिवाय या समस्या सुटणे अशक्‍य असल्याने यापुढे कंत्राटी कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवक्रांती कामगार संघटना काम करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)