कंटेनर-मोटार अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

  • पुणे-मुंबई द्रुतगतीवरील घटना : मुलगा गंभीर जखमी

कामशेत – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरवर मोटर आदळून झालेल्या अपघातात आंबेगाव तालुक्‍यातील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ताजे गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 4) दुपारी तीन वाजल्याचा सुमारास ही घटना घडली.

मारुती भाऊ थोरात (वय 58), त्यांच्या पत्नी शांताबाई (वय 54, दोघेही रा. चांडोली, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अपघातात थोरात दात्पत्याचा मुलगा नितीन (वय 34) हा गंभीर जखमी झाला आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्‍यातील पती-पत्नी आणि मुलगा हे तिघे मुंबईहून पुण्याच्या दिशेने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मंगळवारी दुपारी जात होते. त्यांची मोटार ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्ग (किलोमीटर क्रमांक 68/400) जवळ त्यांच्या मोटार (एम. एच. 14 जी. एच. 8239) द्रुतगती मार्गाच्या पुणे लेन क्र. 3 व 4 वर उभ्या असलेल्या कंटेनरला (एम. एच. 46 ए. एफ. 410) पाठीमागून जोरात धडकली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात मारुती भाऊ थोरात आणि त्यांच्या पत्नी शांताबाई या दोघांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा नितीन हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर निगडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)