कंटेनरच्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू

महाळुंगे इंगळे – पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून वेगात आलेल्या अवजड कंटेनरची जबरदस्त ठोस बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला आणि तिचे आठ महिन्यांचे बाळांचा मृत्यू झाल्याची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर महाळुंगे (ता. खेड) गावच्या हद्दीत आज (बुधवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. बेदरकार कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले असून चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. अश्विनी प्रमोद भोसले (वय 23, रा. साते, ता. मावळ) व त्यांचे आठ महिन्यांचा मुलगा या अपघातात मृत्यू झाला. तर अश्विनी यांचे वडील जखमी झाले असून त्यांच्यावर चाकण येथील जयहिंद या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबतचे वृत्त असे कि, अश्विनी आपल्या वडिलांच्या समवेत स्कूटी दुचाकीवरून (एमएच 14 डी ई 2449) साते (ता. मावळ) येथे जात असताना महाळुंगे गावाच्या हद्दीत पाठीमागून वेगात आलेल्या भरधाव कंटेनरची (एचआर 38 एक्‍स 9808) ठोस बसल्याने दुचाकीला अपघात झाला व दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अश्विनी खाली पडल्या. त्यांच्या हातातील बाळही खाली पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अश्विनी व त्यांचे वडील यांच्यावर उपचार सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)