कंटेनरच्या धडकेत माजी सैनिक ठार

भुईंज, दि. 1 (प्रतिनिधी) – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर बदेवाडी (ता. वाई) गावच्या हद्दीत भरधाव ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. माजी सैनिक उत्तम बळवंत पंडित (वय 73, रा. जांब, ता. वाई) असे अपघातातील मृताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, जांब येथील माजी सैनिक उत्तम बळवंत पंडित हे सोमवारी पावणे बाराच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन जोशीविहिरकडे निघाले होते. ते बदेवाडी गावच्या हद्दीत आले असताना पाठीमागून येत असलेल्या कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि चालकाने भरधाव वेगात पंडित यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पंडित यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या भुईंज पोलिसांना अपघाताची माहिती कळताच सहाय्यक फौजदार संजय मोरे, पोळ हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी पंडित यांना भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अपघातातील कंटेनर ताब्यात घेतला असून चालक राज कुमार तिवारी हा फरार झाला आहे. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)