कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी – भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.26) रात्री दहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील बनकर वस्तीजवळ घडली.

दुचाकी क्र. (एमएच 11, पीपी 0668) वरील दुचाकीस्वाराचा यात मृत्यू झाला. त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. आरोपी कंटेनर चालक अशोक भाऊसाहेब काळे (वय 45, रा. सावता मंदिर, दहेगाव, जि.औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश ढवळे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात दुचाकीस्वार (वय 35) आपल्या दुचाकीवरुन बनकर वस्तीजवळून जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरची (टीएस 08, युबी 0896) दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मयत दुचाकीस्वाराची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)