कंगना आणि सोनू सूदमध्ये जोरदार भांडण

कंगणाचे सारखे कोणानाकोणाशी तरी भांडण सुरूच असते. आता “मणिकर्णिका’च्या सेटवर सोनू सूदबरोबर तिचे जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके जोरदार झाले की कोणी कल्पनाही करू शकत नाही. हे केवळ “मणिकर्णिका’शी संबंधित काही मतभेद असावेत असा पाहणाऱ्यांचा अंदाज होता. मात्र भांडण अगदी पराकोटीला गेले. हे भांडण सोनू सूदला अगदी सहन झाले नाही. त्याने तडकाफडकी सिनेमाच सोडून दिला.

“मणिकर्णिका’मध्ये सोनूच्या रोलमध्ये कंगणा परस्पर कापाकापी करायला लागली होती. त्यामुळेच हे भांडण झाले होते. “मणिकर्णिका’च्या डायरेक्‍टरनी कंगणाबरोबर भांडण झाल्यावर सिनेमा सोडला आणि कंगणाने स्वतःच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सिनेमाच्या क्‍लॅपबोर्डवर दिग्दर्शक म्हणून अधिकृतपणे तिचेच नाव झळकते आहे. पण तिच्या हाताखाली काम करण्यास सोनू तयार नाही.

सोनूने सिनेमा सोडून देण्यामागील कारण कंगणाला विचारले असता तिने वेगळीच कथा ऐकवली. सोनूने “मणिकर्णिका’च्या तारखा “सिम्बाला’दिल्या होत्या. याशिवाय सोनूने स्वतःसाठी कुश्‍तीचे काही सीन लिहीले होते आणि ते “मणिकर्णिका’मध्ये घुसवण्याचा तो प्रयत्न करत होता, असे कारण तिने दिले. सोनूने सिनेमा सोडल्यामुळे आता त्याच्या जागेवर नवीन कलाकार घेऊन पुन्हा शुटिंग करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)