कंगनाने राणी लक्ष्मीबाईंना रुपेरी पडद्यावर अमर केले – मनोज कुमार 

कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका – द क्‍वीन ऑफ झांसी’ उद्या रिलीज होणार आहे. त्याआधी या सिनेमाचे मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार हेही उपस्थित होते. मनोज कुमार यांनी चित्रपट पाहिल्यानंतर कंगना राणावतचे तोंडभरून कौतुक केले आहे. मला वाटते कि, कंगनाचा जन्मच राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका निभावण्यासाठी झाला होता. चित्रपटात सर्वांचे अभिनय चांगले झाले आहेत. मात्र, कंगनाने राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेला पडद्यावर अमर केले, अशा शब्दात मनोज कुमार यांनी कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटात  कंगना राणावतसह अंकिता लोखंडे, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा झळकणार आहेत. चित्रपट निर्माता कमल जैन यांच्यानुसार, कंगनाने ७० टक्के चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दरम्यान, चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)