कंगनाच्या ‘मणिकर्णिके’ला करणी सेनेचा विरोध

झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका या चित्रपटालादेखील करणी सेनेने विरोध करण्याचा इशारा दिला असून झाशीच्या राणी संदर्भात या चित्रपटात आक्षेपार्ह चित्रण केल्याने विरोध करत आंदोलन करणार असल्याचा इशारा करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग शेखावत यांनी दिला. एका ब्रिटिश व्यक्तीशी झाशीची राणी प्रेम करते, अशा प्रकारचे दृश्‍य या चित्रपटात असल्यामुळे ते आक्षेपार्ह चित्रण या चित्रपटातून वगळावे नाही तर निर्मात्याला घरात घुसून मारण्याचा इशारादेखील शेखावत यांनी दिला.

सध्या काही चित्रपटात भारतीय संस्कृती आणि इतिहास संदर्भात खोट्या प्रकारची माहिती पसरवण्याचा काम सुरू आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांना विरोध कायम असणार असल्याचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान “मणिकर्णिका’च्या दिग्दर्शकाने आणि अभिनेता सोनू सूदने कंगणा रणावतच्या हट्टीपणाला कंटाळून सिनेमा सोडला आहे. आता या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतः कंगणाने आपल्याच हातात घेतली आहे. त्यामुळे काही दृश्‍यांचे चित्रीकरण नव्याने करावे लागणार आहे. सिनेमा उशीराने रिलीज होण्याचीही शक्‍यता आहे. अद्याप कंगणाकडून सिनेमातील अडचणींबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)