कंगनाचे राजकारणाबद्दल बेधडक वक्तव्य…

आपल्या बेधडक अभिनयाबरोबरच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी बॉलीवूडची “क्वीन’ अर्थात कंगना राणावत ओळखली जाते. “इन कन्वरसेशन विद द मिस्टिक 2018′ या शोमध्ये सद्‌गुरु जग्गी वासुदेव यांच्यासोबत चर्चा करताना तिने राजकारणाबद्दल असे एक बेधडक मत व्यक्त केले.

पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, माझी राजकारणात येण्याची मुळीच इच्छा नाही. राजकारणाला कोणी करियर म्हणून पाहू नये, ज्यांना राजकारणामध्ये यायचे आहे त्याने जगातील सर्व भौतिकसुखांचा त्याग करून यात यावे. त्यांनी वैराग्याचे धारण करावे. ती असेही म्हणाली की, तुम्हाला जर खरेच राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची असेल तर तुम्हाला तुमचे कुटुंब आणि जीवनातील अन्य गोष्टींचा त्याग करावा लागेल. तेव्हाच तुम्ही देशाची सेवा करण्यास तत्पर असाल. असाच तुमचा दृष्टिकोन असायला हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंगना इतर काही गोष्टींवर प्रकाश टाकत म्हणाली, मला वाटते की देशाच्या सद्यस्थितीवर चर्चा करायला हवी आणि कश्‍याप्रकारे आपण देश एकसंध करू शकतो या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी याबाबत बोलायला तयार नसतात, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)