कंगणा रणावत आणि तिची बहीण रंगोली रणावत यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात एक तक्रार नोंदवली गेली आहे. या दोघी भगिनींनी पाली हिल भागात एक बंगला घेतला आहे. यासाठी एजंटला देण्याचे ब्रोकरेज त्यांनी बुडवल्याची ही तक्रार आहे. कंगणाने गेल्यावर्षी 20 कोटी रुपयांना हा बंगला विकत घेतला आहे. कंगणाने त्यासाठी जेवढे अपेक्षित होते तेवढे ब्रोकरेज दिले नसल्याची तक्रार एका एजंटने केली आहे.

एकूण किंमतीच्या 1 टक्का म्हणजे 20 लाख रुपये ब्रोकरेज देणे अपेक्षित होते. एकूण 3 हजार चौरस फूटांचा हा बंगला खरेदी करण्यासाठी कंगणाने 1.03 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. मात्र ब्रोकरेज दिल्याची नोंद नाही. माझ्या आर्थिक मॅनेजरकडून ब्रोकरेजसाठी 22 लाख रुपये दिले आहेत. मात्र हा एजंट 2 टक्के ब्रोकरेज मागतो आहे. मात्र 2 टक्के ब्रोकरेज देण्याचे ठरलेलेच नव्हते, असे कंगणा म्हणाली. एजंटला पैसे बॅंकेतून थेट ट्रान्सफर केले गेले आहेत. त्याची नोंदही आपल्याकडे असल्याचा दावा तिने केला. दुसरीकडे एजंटनेही आपल्याकडे सगळे पुरावे असल्याचा दावा केला असून ते योग्यवेळी दाखवण्याची तयारी दाखवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)