औषधे घेताना या काही गोष्टी लक्षात ठेवा…

मेडिसीन टिप्स…

कोणतीही औषधे घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला डॉक्‍टरने दिलेली औषधे ही तुमची प्रकृती आणि लक्षणे, तुमच्या आजाराची पार्श्‍वभूमी याचा विचार करून दिलेली असता. म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा…

1. तुम्हाला डॉक्‍टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन हे फक्‍त आणि फक्‍त तुमच्यासाठीच आहे. त्यामधील औषधे त्याच लक्षणांसाठी इतरांना देऊ नका, सुचवू नका.
2. तुम्हाला झालेल्या आजारावर डॉक्‍टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार तुम्ही औषधे आणली असतील, तर तुमचा आजार बरा झाल्याची तुम्हाला जाणीव झाली तरी दिलेला डोस पूर्ण करा.
3. दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार तुम्ही उपचार घेतले आणि नंतर काही औषधे शिल्लक राहिली, तर नक्की समजा की, तुम्ही औषधे घेण्यात नक्की काही तरी चूक केली आहे. अशी शिल्लक औषधे एकतर घरात ठेऊ नका किंवा डॉक्‍टर/केमिस्टला विचारून त्याची विल्हेवाट लावा. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही औषधे अन्य कोणाला देऊ नका.
4. कोणतेही जुने किंवा बाजारातून आताच आणलेले औषध सेवन करण्यापूर्वी त्यावरील एक्‍स्पायरी डेट अवश्‍य पहा. जर ही एक्‍सापयरी डेट अगदी जवळची असेल, तरी त्याची कल्पना केमिस्टला द्या आणि शक्‍यतो औषधे बदलून घ्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
6 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)