औषधाच्या दुकानातून 40 हजार लंपास

उरुळी कांचन- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रोडवरील औषधाच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये चोरून नेले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उरुळी कांचन येथील आश्रम रोडवर संतोष नरसिंग कांचन (वय 35, रा. उरुळी कांचन) यांचे औषधाचे दुकान आहे. रविवारी (दि. 5) रात्री 11 वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश करून दुकानात असलेले 40 हजार रुपये चोरून नेले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत. उरुळी कांचन येथील डाळींब रोडवर एका तरुणांच्या घरी देखील चोरी झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)