औषधांचे दुष्परिणाम

 

औषधामुळे निर्माण होणारी प्रकाश असंवेदनशीलता
कांही औषधी द्रव्ये शरीरामध्ये घेतल्यानंतर रुग्णामध्ये प्रकाश असंवेदनशीलता निर्माण करतो, ज्यामुळे रुग्ण प्रकाश सहन करू शकत नाही. असा परिणाम दाखवणाऱ्या औषधाची संख्या मात्र कमी आहे. या गोष्टींचा विचार केला असता असे लक्षात येते की, औषधे हे अत्यंत धोकादायक परिणाम घडवू शकतात.त्यामुळे औषधांचा वापर हा योग्य वेळी औषधी अथवा वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याप्रमाणे केला पाहिजे. अयोग्य औषध, अयोग्य रुग्णामध्ये, अयोग्य वेळी, अयोग्य स्वरूपात, अयोग्य आजारावर वापरू नये. योग्य औषध, योग्य रुग्णामध्ये, योग्य वेळी, योग्य स्वरूपात, योग्य आजारावर वापरले गेले पाहिजे. तरच वरील गंभीर परिणाम टाळून उपचार होऊ शकतील. औषधे ही दुधारी तलवार असून ती काळजीपूर्वक वापरली पाहिजेत. अन्यथा त्यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी औषधी तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ञ्‌ यांच्या ज्ञानाचा, माहितीचा आदर केला पाहिजे. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे वापरली पाहिजेत. स्वनिर्णित औषधोपचार किती धोकादायक असू शकतात हे यातून दिसून येते.

 

औषधांच्या शरीरावरील क्रिया व परिणामाबद्दल आपण माहिती घेतली आहेच. ही औषधे उपयुक्त व चांगल्या परिणामाबरोबरच कांही अनपेक्षित दुष्परिणाम हि दाखवतात. असे दुष्परिणाम रुग्णांसाठी अडचणीचे व धोकादायक ठरतात. (अर्वींशीीश एषषशलीीं) त्यामुळे औषधे वापरत असताना औषधी तज्ज्ञांच्या अथवा वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतली पाहिजेत. कुठलेही औषध स्वयंनिर्णयाने घेऊ नये. या लेखामध्ये आपण औषधांच्या अशा धोकादायक परिणामाचा विचार करणार आहोत. असे दुष्परिणाम दिसत असतील तर औषधांचा वापर तात्काळ थांबवून या लक्षणांवर उपचार करावा लागतो.
या दुष्परिणामांचा विचार औषधांचा वापर करण्यापूर्वी केला जातो. सध्या औषधांची खूप मोठ्या प्रमाणात व सहज उपलब्धता झाली असून औषधे अत्यंत परिणामकारक आहेत. त्यामुळे औषधांचा वापर वाढला असून औषधी वैद्यकीय तज्ज्ञांचे दुर्लक्ष, तज्ञाकडून वाढता वापर, स्वयंनिर्णित औषधोपचार यामुळे या दुष्परिणामाचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणकारक रासायनिक पदार्थ, पर्यावरणातील रासायनिक पदार्थ यांच्यामुळेही असे दुष्परिणाम होऊ शकतात.
या परिणामाचा विचार केला असता असे लक्षात येते की, यातील कांही परिणाम अत्यंत किरकोळ स्वरूपाचे (डळवश शषषशलीीं) असून अशा परिणामांना ग्राह्य धरून स्वीकारले जाते. तीव्रतेनुसार त्यावर उपाय केले जातात. परंतु कांही वेळा असे परिणाम अत्यंत गंभीर असतात. असे परिणाम दाखवणाऱ्या औषधांचा वापर काळजीपूर्वक व कमी प्रमाणात केला जातो. हे दुष्परिणाम कांही घटनांमध्ये कालांतराने कमी झाल्याचे दिसून येते. तसेच औषधी देण्याचा मार्ग, औषधाचे स्वरूप, औषधाची मात्रा व वारंवारिता बदलून असे परिणाम कमी करता येऊ शकतात.
हे दुष्परिणाम घडून येण्याचे नेमके कारण पहिले असता असे लक्षात येते की, ठराविक औषधी द्रव्याच्या गुणधर्मामुळे विशिष्ट पेशी, उती, अवयव अथवा संस्थांवर त्यांचा अतिरिक्त परिणाम होतो. त्यातून अशी लक्षणे दिसून येतात. हे परिणाम कधीकधी अनपेक्षित आणि अनाकलनीय असतात. या परिणामाचा अंदाज देखील ठरवता येत नाही. कारण असे परिणाम त्या औषधांच्या संशोधन व विकास प्रक्रियेदरम्यान देखील दिसून येत नाहीत.
औषधाची ऍलर्जी
कांही औषधे कांही रुग्णामध्ये अनपेक्षित असे परिणाम दाखवतात. सहसा ही लक्षणे त्वचा, श्‍वसनसंथा यावर दिसून येतात. प्राथमिक पातळीवरील ही लक्षणे औषधांचा वापर थांबवला असता लगेच थांबतात. सहसा ही लक्षणे गंभीर स्वरूप धारण करीत नाहीत. परंतु श्‍वसन संस्थेवर कांही रुग्णामध्ये श्‍वसन संस्थेवर याचा गंभीर परिणाम दिसून येतो. या संबंधी वैद्यकीय सल्ला व उपचार आवश्‍यक ठरतो. ही लक्षणे गुणसूत्रांच्या वैविध्यपूर्ण रचनेमुळे दिसून येतात.
गुणसूत्रांच्या असाधारण रचनेचे परिणाम
कांही रुग्णामध्ये कांही गुणसूत्रांच्या रचनेमध्ये जन्मतः बदल असतो.त्यामुळे त्या गुणसूत्रापासून तयार होणाऱ्या पदार्थांची देखील रचना बदलत असते.असे पदार्थ विशेषतः विकरे जर एखाद्या औषधाच्या चयापचयाशी संबंधित असतील तर त्या औषधाचा चयापचय कमी जास्त होत असतो.त्या औषधाचा अनपेक्षित व असाधारण परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ शकतो.
औषधांच्या एकत्रीकरणातून होणारे परिणाम
अनेक आजारांच्या उपचारासाठी एकापेक्षा जास्त औषधे एकत्रित केली जातात. अशा औषधांच्या वापरामुळेसुद्धा औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात.अनेक औषधांचे स्थलांतर व क्रिया एकाच अवयवावर अथवा संस्थेवर असू शकतात. त्यामुळं असे परिणाम होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे औषधे एकत्रित करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
आजारामुळे निर्माण होणारे परिणाम
ज्या रुग्णांना यकृत, मूत्रपिंड या अवयवाशी संबंधित आजार असतात त्या रुग्णांच्या शरीरावर औषधांचे विपरीत परिणाम होण्याची शकतात. कारण हे अवयव औषधांच्या स्थानांतर व क्रियांशी संबंधित असतात. मानसिक रोगांच्या रुग्णांमध्येदेखील औषधांचे परिणाम वेगळे दिसू शकतात. त्यावेळी अशा रुग्णांच्या संतुलनासाठी औषधांचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे.
कर्करोग निर्मितीकारक परिणाम
कांही औषधी द्रव्ये पेशींवर अत्यंत हानिकारक परिणाम घडवून आणतात. त्यामुळे त्या पेशींचे कर्करोग जनक पेशींमध्ये रूपांतर होऊ शकते. त्यामुळे अशी औषधे वापरने अत्यंत धोकादायक असते.सहसा असे परिणाम औषधांचा दीर्घकालीन वापरामुळे घडू शकतात.अशाच पद्धतीने वातावरणातील प्रदूषणकारक व पर्यावरणीय रासायनिक पदार्थामुळे देखील कर्करोगजनक पेशी निर्माण होऊ शकतात.
औषधांवरील अवलंबित्व
कांही औषधांच्या दैनंदिन व दीर्घकालीन वापरामुळे त्या औषधाचा शरीरावर असा परिणाम होतो की, त्या औषधांची शरीराला सवय लागते. त्यातूनच औषधाची गरज व अवलंबित्व निर्माण होऊ शकते. याचा अर्थ असा आहे कि त्या रुग्णाच्या दैनंदिन कार्यासाठी औषधाची गरज असते. असे होणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशी औषधे दीर्घकालीन वापरताना याचा विचार करावा लागतो.
औषधाच्या मात्रेमुळे होणारे परिणाम
औषधाची मात्र कांही कारणामुळे वाढली असता त्या औषधाचे घातक परिणाम शरीरावर दिसू शकतात.या वेळी औषधाचा वापर तात्काळ थांबवणे आवश्‍यक असते.त्याबरोबरच या लक्षणासाठी उपचार म्हणून औषधांविरोधी गुणधर्माचे औषधी पदार्थ दिले जातात.
गरोदर महिलांमध्ये होणारे परिणाम
गरोदर महिलांमध्ये औषधी द्रव्याचे वितरण गर्भाच्या रक्त प्रवाहामध्ये होत असल्यामुळे औषधांचा परिणाम गर्भाच्या विकसनशील पेशींवर होऊन त्यामध्ये वैगुण्य निर्माण होऊ शकते. याचा गंभीर परिणाम वाढ होणाऱ्या गर्भाच्या विकासावर होऊन ते बाळ आजार घेऊनच जन्माला येऊ शकते.हा परिणाम अत्यंत गंभीर आहे त्यामुळे गरोदर मातांना औषधे देताना याचा विचार महत्वपूर्ण ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)