औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांचा पुन्हा राडा

एका दिवसासाठी तिघांचे सदस्यत्व रद्द
औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका गोंधळ आणि विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यासाठी बोलावलेल्या सभेच्या सुरुवातीलाच पालिकेमध्ये काही सदस्यांनी गोंधळ घालत स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास अडथळा आणून घोषणाबाजी केली. या गोंधळ घालणाऱ्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले.

कैलास गायकवाड, गोकुळ मलके, राहुल सोनवणे असे एका दिवसासाठी सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

तीन दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये शहर विकास आघाडीचे गटनेते आणि मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा स्वतःचीच शिफारस केली. यामुळे बारवाला यांच्यावर संतापलेल्या शहर विकास आघाडीतील सदस्यांनी त्यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध करत गोंधळ घातला. तसेच अंदाजपत्रकाच्या प्रती भिरकावल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)