औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती

औरंगाबाद : नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. मागील आठवड्यापासूनच त्यांच्या नियुक्तीवर सोशल मीडियात चर्चा सुरू होती. आज त्यांना नियुक्ती पत्र मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे परिस्थिती काहीशी बिघडत चालली होती. 11 मे रोजी औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला तात्काळ पोलीस आयुक्त द्या, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री आज चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)