औरंगाबाद तोडफोड प्रकरणी 41 जण अटकेत

औरंगाबाद – मराठा आंदोलनादरम्यान म्हणजेच 9 ऑगस्टला वाळूज एमआयडीसीमध्ये मोठी तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी 41 जणांना अटक केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. हा बंद शांततेत पार पाडावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये 60 कंपन्यांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र बंद संपण्याच्या वेळी ही तोडफोड झाली. या सगळ्या प्रकारावर उद्योजक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली. तर वोक्‍हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळही काही आंदोलकांनी गोंधळ घातला. या तोडफोडीत एमआयडीसीच्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 41 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर मराठा मोर्चा समन्वय समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत औरंगाबाद तोडफोडीत बाह्य शक्तींचा हात होता. यामध्ये आंदोलक नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)