औरंगाबाद : तीन नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन

औरंगाबाद- महापालिका स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास अडथळा आणून घोषणाबाजी करणाऱ्या   तीन नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही अन्य सदस्यांची शिफारस करण्याऐवजी पुन्हा स्वतःच्याच नावाची शिफारस केली. यामुळे शहर विकास आघाडीतील सदस्यांनी त्यांना आज  सभागृहात विशेष बैठकीमध्ये वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास विरोध केला.

मात्र  महापौरांनी सभापती बारवालांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास पाचारण केले. यामुळे नगरसेवक कैलास गायकवाड, गोकुळ मलके, राहुल सोनवणे यांनी याला जोरदार विरोध करत घोषणाबाजी सुरू केली. महापौर पक्षपात करत असल्याचा आरोप करून बजेटच्या प्रती सभापती व महापौरांच्या अंगावर फेकल्या. त्यामुळे महापौरांनी त्यांच्यावर एक दिवसासाठी निलंबनाची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)