औरंगाबादेतून देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयच्या ताब्यात

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येत वापरलेल्या पिस्तुलाशी साम्य

नवी दिल्ली – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी जसे पिस्तुल वापरण्यात आले होते, त्याच्याशी साम्य असलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयने आज औरंगाबादेतून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन पांडुरंग आंदुरेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक कुकरी, 3 जिवंत काडतुसे आणि 7.65 बोअरचे पिस्तुल जप्त करण्यात आले.

दाभोळकर यांच्या हत्येसाठी हेच पिस्तुल वापरले गेले होते का, हे तपासण्यासाठी हे पिस्तुल बॅलिस्टिक तपासणीला पाठवून दिले जाणार आहे, असे सीबीआयच्यावतीने सांगण्यात आले. सचिन अंदुरे याच्या नातेवाईकाच्या मित्राकडून ही शस्त्रे ताब्यात घेण्यात आली.

मूळ औरंगाबादचा रहिवासी असलेल्या अंदुरे याला 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडणाऱ्या दोघांपैकी तो होता, असा संशय आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने शस्त्रास्त्र विषयक एका अन्य प्रकरणी तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने अंदुरेला अटक केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)