औरंगाबादमध्ये 5 लाखांच्या नवीन बनावट नोटा जप्त

एका प्रिंटरससह दोघांना अटक
औरंगाबाद: औरंगाबादच्या बायजीपुरामधून तब्बल 5 लाख रुपयांच्या नवीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये शंभर, पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रिंटरससह दोघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. माजिद खान आणि बिसमिल्ला खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
42 वर्षाचा बिसमिल्ला खान हा या बनावट नोटा तयार करत होता. पाच लाखांच्या खोट्या नोटांसाठी तो अडीच लाख घेत होता. अशी माहिती समोर येत आहे. हुबेहुबे दिसणाऱ्या या बनावट नोटा चटकन ओळखणे कठीण आहे. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून माजिद खान आणि बिसमिल्ला खान यांना अटक केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली तरी यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा देखील पोलीस तपास करत आहेत. तसेच यासाठी कोणते रॅकेट काम करते का याचाही शोध सध्या सुरु आहे. दरम्यान, बनावट नोटांना आळा बसावा हे देखील नोटाबंदीचे एक कारण कारण होते. मात्र, काही महिन्यातच नव्या खोट्या नोटा बाजारात आल्याने नोटाबंदीच्या या उद्देशाला काहीशा प्रमाणात धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)