औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या 

file photo
औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असून औरंगाबादमध्ये आज आणखी एका तरूणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव होता. त्यानंतर तहसीलदारांनी मृताच्या नातेवाईकांना दहा लाखाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
किशोर शिवाजी हार्दे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना खुलताबाद तालुक्‍यातील गल्ले बोरगाव येथे घडली. किशोर शिवाजी हार्दे याने आज सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध सुरू केला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तापले. त्यामुळे औरंगाबाद येथे एका बैठकीला गेलेले तहसीलदार राहुल गायकवाड बैठक सोडून घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. मृताच्या कुटुंबीयांना दहा लाखाची मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे वातावरण निवळले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)