औरंगाबादमध्ये अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्‍याचा एल्गार 

औरंगाबाद: औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर आज अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्‍याचा एल्गार पहावयास मिळाला आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल ए मुसलमिनचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले. बहुजन वंचित आघाडीच्या पहिल्या सभेसाठी तब्बल 5 लाख लोकांचा समुदाय जमवण्याचा निर्धार करण्यात आला होता.
सभेकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे. अनुसुचित जाती आणि मुस्लीम समाजाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी हे दोन बडे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकारणातील नव्या राजकीय मैत्रीच्या समीकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे दिसून येत आहे.
समुदायानुसार जर राजकीय ताकदीचा अंदाज घेतला तर मुस्लीम समाज 8 टक्के, अनुसुचित जाती- 8 टक्के, आदिवासींची संख्या 8 टक्के एवढी आहे. त्यामुळे या 28 टक्के व्होटबॅंकेचे आंबेडकर-ओवेसी मोठे भागीदार असतील. 30 वर्षानंतर आता पुन्हा आंबेडकर आणि ओवेसी एकत्र येत आहेत.
दरम्यान, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, आनंदराज आंबेडकर असे अनुसुचित जाती-जमातीच्या नेत्यांचे किमान डझनभर गट आहेत. त्यामुळे मतांची विभागणी अटळ आहे. शिवाय मुस्लिमांमध्ये 2014 इतकी एमआयएमची क्रेझ नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवेसी एकत्र आल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्‍यता आहे. जो अर्थात भाजपचा फायदा असेल. पण दलित-मुस्लिमांचा किती फायदा होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)