औरंगाबादच्या कचऱ्याची पंचसुत्री तयार – मुख्य सचिव

मुंबई – औरंगाबदाचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पंचसूत्री तयार केली आहे. या पंचसूत्रीनुसार कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानुसारच कचऱ्याची विल्हेवाट लावा, असे स्पष्ट निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज दिले.

औरंगाबाद शहर कचराप्रश्नासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद शहराच्या कचरा प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

त्याअनुंषगाने नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनी औरंगाबाद येथे जाऊन कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पंचसूत्री तयार केली आहे, त्यानुसार हा प्रश्न मार्गी लावावा. कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यानुसारच कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचऱ्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करणे, ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणे, सुका कचरा जमा करण्याचे केंद्र प्रत्येक प्रभागात सुरू करणे, यापुढे कचछयाचे कुठेही डंपिंग होणार नाही याची काळजी घेऊन या पंचसूत्रीनुसार औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)