औरंगाबादच्या उपमहापौरांचा वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरांनी चक्क दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशासोबत सेल्फी घेण्याचा आचरटपणा केला. या सेल्फीमुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे.

हा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर उपमहापौर विजय औताडे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. सेल्फी कुठे घ्यायचा आणि कुठे नाही, याचे तारतम्य सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी ठेवायला हवे, अशाही प्रतिक्रिया औरंगाबादकरांनी दिल्या आहेत.

विशेष म्हणजे वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण करण्यात औताडे यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)