औरंगाबादचे उपमहापौर औताडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेचे उपमहापौर आणि भाजप नेते विजय औताडे यांच्याविरोधात महापालिकेच्याच एका अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एस. ए. चाहेल असे तक्रार दाखल करण्या-या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून कार्यारत आहेत.

शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारण्याचा प्रयत्न करणे असे आरोप या अधिकाऱ्याने तक्रारीत नोंद केले आहेत. मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी सभा संपल्यानंतर उपमहापौरांनी अँटी चेंबरमध्ये बोलावले आणि त्यांच्या वार्डातील कामाच्या टेंडरवर सही करायला सांगितली, असा आरोप या अधिकाऱ्याने केला. मात्र ते नियमांत बसत नसल्याने त्यावर तसा शेरा मारला म्हणून उपमहापौर भडकले आणि त्यांनी मारण्याचा प्रयत्न केल्याचे चाहेल यांनी फिर्यादित म्हटले आहे.

याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे, तर मनपा आयुक्तांनाही तसे पत्र पाठवले आहे. या पत्रात कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा हेमंत कोल्हे यांनीही दबाव आणल्याचा आरोप केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)