औद्योगीक धोरणाचा आढावा चालू

नवी दिल्ली – बदललेल्या परिस्थिीतीत औद्योगीक आणि मॅन्युफॅक्‍चरींग धोरणाचा आढावा घेणे चालू आहे. आज जगात चौथी औद्योगीक क्रांती चालू असून यात भारत पुढे राहील याची काळजी घेण्यात येत असल्याचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री निर्मला सितारामन यांनी सांगीतले.

सेझ आरि इतर उपक्रमाचाही आढावा घेतला जात असल्याचे त्यानी सांगीतले. या अगोदर 2009 मध्ये मॅन्युफॅक्‍चरींग धोरण जाहीर झाले होते. त्याचबरोबर 2011 मध्ये औद्योगीक धोरण जाहीर झाले होते. त्यानुसार आता काम योग्य प्रकारे चालू आहे.

राष्ट्रीय उत्पन्नातील मॅन्युफॅक्‍चरींगचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे ते वाढऊन 25 टक्‍क्‍यापर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यानी सांगीतले. त्यासाठी भारताला म्युन्युफॅक्‍चरींग हब करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यानी सांगीतले. मात्र हे करीत असताना भारत माहीती तंत्रज्ञान क्षेत्राकडेही लक्ष ठेउन आहे भारताने या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. मात्र आता या क्षेत्रात नवे बदल होत आहेत. त्यातही भारताने पुढे राहावे याकरीता प्रयत्न केले जात असल्याचे त्यानी सांगींतले.

इंटरनेट आधारीत उद्योग तसेच रोबोटीक तंत्रज्ञान वेगात विकसित होत आहे. त्यासाठी भारतीय उद्योग क्षेत्र कितपत तयार आहे. याचा आढावा उद्योगाकडून आणि उद्योजकांच्या संघटनाकडून घेतला जात असल्याचे त्या म्हणाल्या. कृत्रीम बुध्दीमत्ता क्षेत्रातील वेगवान घडामोडीचा आढावा घेण्यासह वाणिज्य मंत्रालयाने एक कृती गट तयार केला आहे. या गटाच्या अहवलाचा नवे धोरण तयार करतांना विचार केला जाणार असल्याचे त्यानी सागींतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)