औद्योगिक पट्ट्यातील भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार

तालुका प्रमुख पोपटराव शेलार यांची माहिती : स्थानिकांना उद्योग, व्यवसायात नोकरीत सामावून घ्या

रांजणगाव गणपती – शिरुर तालुक्‍यातील कोरेगावपासून ते कारेगावपर्यंतच्या औद्योगिक पट्ट्यात स्थानिक भूमिपुत्र उपाशी तर तालुक्‍याबाहेरचे तुपाशी अशी परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना उद्योग, व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध होण्यासाठी शिवसेना लवकरच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मोठे आंदोलन करणार आहे, असे तालुका प्रमुख पोपटराव शेलार यांनी सांगितले आहे.

शिरुर तालुक्‍याच्या बाहेरील राजकीय नेते मंडळींनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह इतर ठिकाणी आपले बस्थान बसवल्याने तालुक्‍यातील बेरोजगारीत अधिक वाढ झाली आहे. बहुतांश कंपन्यांचे अधिकारी हे आपल्या गावाकडील मुलांना कंपन्यांमध्ये स्थानिकांना डावलून नोकरी आणि व्यवसायात आपल्या गावाकडील नागरिकांना स्थान देत आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्‍यात बेरोजगारीत वाढ झाली आहे.

पुणे-नगर महामार्गालगत 30 वर्षाहून अधिक काळापासून कोरेगाव भीमापासून ते कारेगावपर्यंत विस्तीर्ण अशी औद्योगिक वसाहत पसरली आहे. मात्र, या औद्योगिकरणामध्ये काही अपवाद वगळता स्थानिकांना पूर्णतः डावलण्यात आले आहे. शिरुर तालुक्‍याचे नाव सांगितले तर कंपन्या प्रवेशव्दार(गेट)वरही उभे करत नाहीत. उद्योग आणि व्यवसायासाठी स्थानिक तरुण वणवण फिरत आहेत. मात्र, या तालुक्‍यातील राजकीय नेत्यांना कसलेही घेणे-देणे नाही. परिणामी तालुक्‍यात बेकारांची फौज मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या सर्व बाबींचा विचार करुन स्थानिकांना व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी लवकरच शिवसेना आंदोलन करणार आहे, असे शिवसेनेचे तालुका प्रमुख पोपटराव शेलार यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)