औद्योगिक उत्पादन वाढले; महागाईने घेतली माघार

विकासदर वाढता राहण्याची शक्‍यता वाढली

नवी दिल्ली -तिसऱ्या तिमाहीतीतल विकासदर वाढल्यानंतर चौथ्या तिमाहीतही विकासदर वाढण्याची लक्षणे वाढली आहेत. जानेवारी महिन्यातील वाढलेल्या औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी सोमवारी जाहीर झाली आहे. जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन 7.5 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या महिन्यात नोटाबंदीमुळे औद्योगिक उत्पादन केवळ 3.5 टक्‍क्‍यांनी वाढले होते. आता आगामी काळातही औद्योगिक उत्पादन वेग घेण्याची शक्‍यता सरकारला वाटते.
गेल्याच आठवड्यात कर्ज पुरवठा 12 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जीएसटी आणि नोटाबंदीचे परिणाम कमी होत असल्याची लक्षणे दिसून येत आहे. जर औद्योगिक उत्पादन वाढले तर चौथ्या तिमाहीतील विकासदरही वाढण्याची शक्‍यता आहे. तिसऱ्या तिमाहीतील विकासदर चीनपेक्षाही जास्त झाला आहे. त्याचबरोबर आगामी काळात चीनने विकासदर 6.5 टक्‍के राहील असे सांगितले आहे. त्यामुळे आता दीर्घकाळ जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.

-Ads-

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात महागाई कमी झाल्याची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काही काळ तरी रेपो दरात वाढ होण्याची शक्‍यता मंदावली असल्याचे समजले जाऊ लागले आहे. याचा अंदाज गुंतवणूकदारांना दुपारीच आल्यामुळे भारतीय शेअरबाजारात जोरदार खरेदी झाली. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर केवळ 4.44 इतका मोजला गेला आहे. जो की जानेवारी महिन्यात 5.07 टक्‍के इतका होता. आताही महागाईचा दर सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने ठरविलेल्या 4 टक्‍क्‍यापेक्षा जास्तच आहे. मात्र, तो कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. आता जर पाऊस चांगला पडला तर महागाई कमी पातळीवर राहण्याची शक्‍यता वाढू शकते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, असे बोलले जाऊ लागले आहे. आता किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. अन्नधान्य आणि इंधनाचे दर कमी झाल्यामुळे एकूण महागाईचा दर कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते आहे. आता जर आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुडचे दर कमी झाले तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)