औद्योगिक उत्पादनात वाढ

           सरकारला दिलासा; किरकोळ महागाईतही झाली घट

नवी दिल्ली – वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे सरकारसमोर प्रश्‍न निर्माण झाले असताना औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवर मात्र आशादायक चित्र निर्माण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादक 7.1 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या चार महिन्यापासून औद्योगिक उत्पादन वाढत आहे. त्यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या काळातील वाढलेल्या उत्पादकतेमुळे विकासदर वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 1.2 टक्‍क्‍यांनी वाढले होते. आता नोव्हेंबर महिन्यात ते 8.54 टक्‍क्‍यांनी, डिसेंबर महिन्यात 7.1 टक्‍क्‍यांनी, जानेवारी महिन्यात 7.4 टक्‍क्‍यांनी आणि आता फेब्रुवारी महिन्यात 7.1 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. यामुळे सरकलेल्या वर्षांच्या एकूण विकासदराला आधार मिळणार आहे. एप्रिल तेफेब्रुवारी या काळातील औद्योगिक उत्पादन वाढ आता 4.3 टक्‍के इतकी झाली आहे.

फेब्रुवारीमधील औद्योगिक उत्पादन मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राच्या वेगवान वाढीमुळे वाढले आहे. या क्षेत्राची उत्पादकात तब्बल 8.7 टक्‍क्‍यांनी वाढलेले आहे. त्याचबरोबर भांडवली वस्तू क्षेत्राची उत्पादकता वाढल्याचाही या आकडेवारीवर परिणाम झाला आहे. ग्राहक वस्तू क्षेत्राची उत्पादकता या महिन्यात 7.9 टक्‍क्‍यांनी, ऊर्जानिर्मिती 4.5 टक्‍क्‍यांनी वाढली असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. यामुळे आगामी काळाबाबतही आशादायक वातावरण निर्माण झाले असल्याचे उद्योजकांच्या संघटनाना वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)