औद्योगिकीरणामुळे नद्यांचा नाश – डॉ. विश्वास येवले

पिंपरी – वाढते औद्योगिकीकरण नद्यांचा नाश होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले यांनी व्यक्‍त केले आहे. पिंपरी चिंचवडमधील विविध सामाजिक संघटना, भावसार व्हिजन व पिंपरी-चिंचवड जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने आकुर्डी येथे आयोजित नदी विषयक व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी ते बोलत होते.

डॉ. येवले म्हणाले की, नदीसोबत नागरिकांचे नाते भावनिक असायला पाहिजे आणि हीच बाब नद्यांची आजची परिस्थिती सुधारण्यासाठी उपयोगाची ठरु शकते. नदीशी संवाद साधणे महत्त्वाचे असून पाणी हाच मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या औद्योगिकीरणामुळे रोज एका नवीन शहराची निर्मीती होत असून नद्यांचा नाश होत आहे. त्यामुळे विकासाच्या या प्रवासात नद्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या नद्या पूर्वी शुद्ध पाणी पुरवत होत्या त्या आज इतक्‍या प्रदुषित झाल्या आहेत की त्यांचे पाणी पिण्या योग्य राहिले नाही.

नदी पात्रात जलपर्णी कुठून आल्या याचा शोध घेतला आहे. जलपर्णीचा उगम हा दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन खोऱ्यात झाला आहे. नंतर हेच बी जगभर पसरले गेले. नदीच्या पाण्यात तापमान व प्रकाशपूरक असेल व सोबत नायट्रोजन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर तिथे जलपर्णींची वाढ दुप्पट वेगाने होते. प्रखर सूर्यप्रकाश व उच्च तापमानामध्ये या वनस्पती वाढत जातात. पाण्यातील चिखलात बी खोलवर जाते, हे रुजलेले बी वीस वर्षांपर्यंत जिवंत राहते. त्यामुळेच जलपर्णी वारंवार फोफावत राहते. त्यामुळे पाण्यातील मासे व इतर जलवनस्पतींच्या वाढीवर त्याचा थेट परिणाम होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)