औद्योगिकनगरी पुन्हा गारठली

पिंपरी – उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे पुणे शहरासह औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या तापमानात पुन्हा घट झाली आहे. तापमानाचा पारा किमान 12 अंशापर्यंत घसरल्याने पुन्हा एकदा थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यावर्षी डिसेंबर महिन्यात व जानेवारी महिन्याच्या पंधरवाड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कमालीच्या थंडीचा अनुभव आला होता. किमान तापमानाचा पारा थेट 6 अंश ते 8 अंशापर्यंत घसरलेला होता. मात्र, मागच्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात तापमानात काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांची थंडीपासून सुटका झाली होती. तापमानाचा पारा 14 अंशावर गेल्यामुळे रात्री तसेच पहाटेही थंडीची तीव्रता कमी जाणवत होती. त्यामुळे नागरिकांनी आपले उबदार कपडे कपाटात ठेवले होते. मात्र, मागच्या काही दिवसापासून थंड वारे वाहु लागल्याने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे तापमानाचा पाराही खाली घसरला असून थंडीची लाट पुन्हा सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुवार (दि. 24) पासून तापमानात घट होण्यास सुरूवात झाली. यादिवशी किमान तापमान 12 अंश नोंदवले गेले. तर शुक्रवारी (दि. 25) 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर प्रजासत्ताक दिनीही थंडीची लाट कायम होती. थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस गुलाबी थंडीतच काढावे लागणार असे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)